युनायटेड क्रिकेट क्लब क्रिकेट स्पर्धा

मनल इलेव्हन वालवटी संघ विजेता

| महाड | वार्ताहर |

युनाटेड क्रिकेट क्लब आयोजित महाड चॅम्पीयन्स ट्रॉफी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मनल इलेव्हन वालवटी हा संघ विजेता ठरला, तर मेहल इलेव्हन टेमपाले या संघाला उपविजेते पदावर समाधान माणावे लागले. विजेत्या संघाला 1 लाख रुपये किंमतीची चांदीची चकाकणारी ट्रॉफी व 66 हजार सहाशे रुपये रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

शहरांतील गांधारी मैदानावर 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड क्रिकेट क्लबचे मजा फामे आणि रईस शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रेक्षणीय झालेल्या या स्पर्धेत वालवटी हा संघ अंतिम विजेता ठरला.

चार दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पधैत संपूर्ण जिल्हातून 32 नांमाकीत संघानी आपला सहभाग नोंदविला होता. गांधारी नाका क्रीडांगण या ऐतिहासिक मैदानावर या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. गाव टू गाव पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख 66 हजार सहाशे सहासष्ट व 1 लाख रुपये किमतीची चांदीचा आकर्षक चषक द्वितीय क्रमांक 33 हजार तिनशे तेहतिस तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 11 हजार एकशे अकरा रुपये रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, आर्यन खारकर उत्कृष्ट फलंदाज वासिम खतीब सामनावीर इलहाम व मालिकावीर मसूद गजगे अशी बक्षिसांची रेलचेल होती. अंतिम सामन्यात मनल इलेव्हन वालवटी संघाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला, तर मेहल इलेव्हन टेंमपाले या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तौसिफ इलेव्हन थळ (अलिबाग) व दिलशान वालवते अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक आला.

चार दिवस पंच म्हणून अमित वाडकर, अमित आणि नंदू यांनी कामगीरी पार पाडली. समालोचन यासिन मर्चट, हर्षल मुंडे, अजित अवसरे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता मजाहा फामे रईस शेख अर्सलान पल्लवकर यांच्यासह युनायटेड क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version