महातिवरणच्या संघाला उपविजेतेपद
| महाड | प्रतिनिधी |
महाड क्रेडाई बिल्डर असोसिएशन आयोजित टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत महाड पोलीस संघ विजता ठरला, तर महाड महावितरण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महाडमधील कै. माणिकराव जगताप क्रीडानगरी नवेनगर महाड येथे क्रेडाई महाड बिल्डर असोसिएशनच्या वतीने दि. 26 व 27 नोव्हेंबरदरम्यान मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण आठ संघांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये बिल्डर असोसिएशन महाड महसूल विभाग, महाड पोलीस, महाड शहर पंचायत समिती, महाड महावितरण, महाड आर्किटेक असोसिएशन, महाड प्रेस असोसिएशन, महाड नगर परिषद या संघांचा समावेश होता. अंतिम सामना महाड पोलीस आणि महावितरण यांच्यात अटीतटीचा खेळला गेला. यामध्ये पोलीस महाड संघ विजेता, तर महावितरण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी तृतीय क्रमांक महाड महसूल विभाला मिळाला. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
तत्पूर्वी, स्पर्धेच उद्घाटन व बक्षीस समारंभ महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाडचे तहसीलदार सुरेश काशिद, मुख्याधिकारी महादेव रोडगे, महाड शहर पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक मिलिंद खोपडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे, महाड तालुका पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत पंच म्हणून गणेश गिरी, अमित निकम, गणेश भात्रे, ओंकार तांबट, गफार शेख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता क्रिडाईचे अध्यक्ष प्रशांत गुजर, सचिव अमित शेठ, उपसचिव चेतन उतेकर, डॉ. दिलीप गाडगीळ, मेहबुब कडवेकर, समीर मोदी, चेतन मुंदडा, विशाल दोषी, जयपाल रावळ, उदय पयेलकर, समीर मोदी, वैभव चांदोरकर, फारुक झमाने आदी क्रिडाईचे सदस्यांनी मेहनत घेतली.