• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एकी बळकट व्हावी

Krushival by Krushival
November 30, 2021
in sliderhome, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केंद्रातील अहंकारी व आडमुठ्या नरेंद्र मोदी सरकारला देशभरातील शेतकर्‍यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडून देशातील शेतकर्‍यांमध्ये राज्यकर्त्यांना नमविण्याची ताकद काय असते हे कृतीने दाखवून दिले आहे. या पाश्‍वर्र्भूमीवर देशातील विरोधी पक्ष एकत्र आल्यास या सरकारला नमविणे शक्य असल्याचा विरोधकांना आत्मविश्‍वास वाटत असून त्याचा प्रत्यय नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या संयुक्त शेतकरी तथा कामगार महापंचायतीमध्ये दिसून आला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी या प्रसंगी केलेल्या भाषणातून तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही आपल्या विवेचनातून नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले. केंद्राने आणलेले तीन कृषी कायदे हे शेतकर्‍यांवर अन्याय करणारे होते.त्यामुळे या कायद्याला संयुक्त मोर्चाच्यावतीने विरोध करण्यात आला होता. या आंदोलनाला राज्यातूनही शेकापसह डावे पक्ष तथा संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता. तो कायम आहे. सरकारने कायदे मागे घेतले असले तरी अजूनही आधारभूत किंमतीबाबतचा मुद्दा बाकी आहे. त्यामुळे जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय संयुक्त मोर्चाने घेतला आहे. त्या निर्णयालाही राज्यातील शेकापसहित सर्वच डावे पक्ष व संघटनांचा पाठिंबा कायम राहिला आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत सुरु करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाला या महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कालखंडात आंदोलन करणारे सातशेहून अधिक शेतकरी शहीद झाले. त्या शहीद शेतकर्‍यांचे अस्थिकलश मुंबईत आणण्यात आले होते. या अस्थिकलश यात्रेत राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांसह कामगार, सामाजिक संघटना सहभागी झालेल्या दिसल्या. मुंबईतील अस्थिकलश यात्रेचे आयोजन संयुक्त किसान मोर्चा, जनआंदोलन संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती या संघटनांनी केले होते आणि त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आप पक्ष, समाजवादी पक्ष आदी समविचारी पक्षांचे नेते, कामगार नेते तसेच जनआंदोलनाच्या संघर्ष समितीचे नेते सहभागी झाले होते. त्यातून विरोधी पक्ष एकवटल्याचे दिसले. ही एकी टिकविण्यासाठी संयुक्त रणनिती आवश्यक आहे. एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी असताना असाच विरोधी पक्ष कमकुवत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तेव्हा इंदिराजींची ताकद ही विरोधकांचा कमकुवतपणा म्हटला जात असे. विरोधक एक झाले की पर्यायी सशक्त शक्ती उभी राहते, हे आता दिसू लागले आहे. त्याही पूर्वी म्हणजे सुमारे नऊ दशकांआधी रायगडमध्ये असेच आंदोलन घडले होते आणि त्यावेळच्या शेतकर्‍यांनी तेव्हाच्या इंग्रज सरकारलाही आपले आडमुठे धोरण बदलण्यास भाग पाडले होते, हे लक्षात ठेवायला हवे. यावेळी जयंत पाटील यांनी आठवण करून दिलेले 88 वर्षांपूर्वी अलिबाग तालुक्यातील चरी येथे स्व.नारायण नागू पाटील यांनी घडवून आणलेले ते संपाचे आंदोलन होते. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही या नेतृत्वाच्या सोबत उभे राहण्याची भूमिका निभावली होती. त्यावेळी शेतकर्‍यांनी प्रदीर्घ काळ शेतजमीन न कसण्याचे धोरण अवलंबल्याने सरकारला या विलक्षण स्वरूपाच्या ठाम आंदोलकांनी उभारलेल्या संपाची दखल घ्यावी लागली होती आणि इतिहास बदलला होता. कारण, त्यामुळेच पुढे कसेल त्याची जमीन आणि कुळ कायदा हे दोन महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आले. त्याच धर्तीवर केंद्रातील कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडून देशातील शेतकर्‍यांनी आपली तीच ताकद आजच्या काळातील इंग्रज सरकारसारखा सापत्न व्यवहार करणार्‍या मोदी सरकारला दाखवून दिली आहे. चरीचा संप आणि सध्या सुरु असलेला शेतकर्‍यांचा संप हे एकाच स्वरुपाच आहेत, असे जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ते खरे आहे. त्याचीच जाणीव विरोधकांनी ठेवायला हवी आणि एकीसाठी आता जसे एकत्र आले तसे व्यापक धोरणाच्या छत्राखालीही एकत्र राहिले पाहिजेत. त्यातूनच यापुढील लोकसभेसाठीच्या लढ्यासाठी ताकद उभी राहील. तसे नाही झाले तर मग तो या ताज्या आंदोलनात शहीद झालेल्या सुमारे सातशे हुतात्म्यांचे बलिदान वाया गेले असे होईल. मात्र तसे होणार नाही असा निर्धार या महापंचायतीच्या निमित्ताने या हुतात्म्यांच्या अस्थिकलशासमक्ष करण्यात आला आहे. त्याची जाण ठेवून हे एकीचे हत्यार या अन्यायकारक, शोषक सरकारच्या विरुद्ध वापरायलाच हवे.

Related

Tags: Editorialmarathimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsunity
Previous Post

संपूर्ण आरक्षण धोरणाच्या पुनर्विचाराची वेळ

Next Post

इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तुही महागल्या

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? नेमकी काय आहे योजना…जाणून घ्या!

इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तुही महागल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?