। पनवेल । प्रतिनिधी ।
कौटुंबिक वादातून एक व्यक्ती राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हरीषचंद्र बाळु कोळी (65), रा.कलश हील, रूम नं 106, से.03, प्लॉट नं. 43, ता. पनवेल, उंची 5.5 फुट अंदाजे, बांधा मध्यम, रंग- सावळा, चेहरा-सरळ, केस पांढरे काळे, अंगात निळ्या रंगाचा शर्ट, व खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. त्याला मराठी, हिंदी भाषा बोलता येते. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहित असल्यास त्यानी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोहवा अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधावा.
कौटुंबिक वादातून अज्ञात व्यक्ती बेपत्ता
