| कोर्लई । वार्ताहर ।
साळाव-मुरुड रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उनाड गुरांचे कळप वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहेत. वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागत असून याकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या रस्त्यावर बोर्ली-ताराबंदर वळण, मजगांवपूल-एसटी.स्टँड, विहूर रस्त्यावर वळणावर उनाड गुरांचा हैदोस असून मुरुडकडे व अलिबाग कडे जाणार्या वाहनचालकांची डोकेदुखी होऊन बसली आहे. या रस्त्यावर गुरांच्या ठिय्यामुळे अनवधानाने दिसण्यात न आल्यास वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागून जिवित व वित्त हानीची शक्यता नाकारता येत नाही.
मागील काळात ग्रामपंचायतीची असलेली कोंडवाडा संकल्पना संपुष्टात आल्याने या त्रासात अधिकच भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर असणार्या उनाड गुरांकडे संबंधितांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष व वेळप्रसंगी अपघाची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यावरील उनाड गुरांचा बंदोबस्त व्हावा. अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून होत आहे.
उनाड गुरांमुळे वाहनचालकांची डोकेदुखी

Exif_JPEG_420