द्वारकानगरी महिला बचत गटाच्या नामफलकाचे अनावरण

। उरण । प्रतिनिधी ।
उरणमधील व्दारकानगरी महिला बचतगटांच्या नामफलकाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी (दि.24) सकाळी 11.30 वा. आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन उरण पोलीस ठाण्याच्या महिला युनीट प्रमुख रचना ठाकूर, प्रिती म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित साईप्रेरणा कॉलनीतील रहिवासी, अनंत घरत, जेष्ठ पत्रकार हेंमंत चव्हाण, विलास तिलोरे, राणा थापा, राव, देशमुख, करण, पवार तसेच आयोजक द्वारकानगरी महिला बचतगटांच्या अध्यक्षा सीमा घरत, उपाध्यक्षा वृशाली कदम, सचिव अमृता गायकवाड, सहसचिव प्रिया कासकर, खजिनदार सुवर्णा पाटील, सल्लागार रोहिणी म्हात्रे, जयश्री चौकेकर, हर्षदा सतेरे, आरती गुंजाळ, संगीता ढवळे, सुरेखा ढवळे, म्हात्रे आदी रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

नगरपालिकेच्या हद्दीतील हे सर्व रहिवासी गेली 12 वर्षांपासून रस्ते, बंदिस्त गटारे, पाणी या मुलभुत गरजांपासून वंचित आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना या परिसराची पाहणी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सोबत माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रेही आल्या होत्या. मुख्याधिकारी यांनी परिसराची पाहणी करून विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version