प्रबोधनकार ठाकरे मार्ग फलकाचे अनावरण

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या शिवशक्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून व यासाठी पनवेल महानगरपालिकडे सातत्याने पाठपुरावा करणारे मा. नगरसेवक व शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक रमेश गुडेकर यांच्या प्रयत्नांमुळे उभारण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिका प्रबोधनकार ठाकरे मार्ग फलकाचे अनावरण शिवसेना मा. जिल्हाप्रमुख माधवराव भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी मा. नगरसेवक राजू सोनी यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख माधवराव भिडे, मा. नगरसेवक रमेश गुडेकर, मंडळाचे अध्यक्ष गौरव वेदक, उपाध्यक्ष संजय पाटील व इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version