| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये मंगळवार, दि.2 मार्च रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये पनवेल तालुका सहकारी भातगिरणीच्या चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची सर्वानुमते निवड झाली, तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या बिनविरोध निवडून आलेल्या 11 संचालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकापचे माजी तालुका चिटणीस नारायण घरत, मा. सभापती काशिनाथ पाटील, एपीएमसीचे सभापती डॉ. दत्तात्रेय पाटील, पमपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, मा. चेअरमन एम.सी. पाटील, मा. व्हाईस चेअरमन राजेंद्र घरत, नैना कमिटीचे अध्यक्ष व संचालक वामन शेळके, पनवेल अर्बन बँक संचालक माधुरी गोसावी, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, नगरसेवक प्रमोद भगत, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, पमपा सहचिटणीस देवेंद्र मढवी, युवा जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, एपीएमसी सचिव भरत पाटील, खारघर शहर चिटणीस अशोक मोरे, तळोजा शहर चिटणीस प्रताप पाटील, पनवेल तालुका सहकारी भातगिरणीचे संचालक मंडळ मीरा विजय म्हात्रे, लीला मारुती भस्मा, गणेश गायकर, दिनकर मुंढे, दत्तात्रय मोरे, अनंता कांबळे, नारायण तुपे, गणेश कोळी, भातगिरणीचे सचिव संदीप केणी, कर्मचारी रुपेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.