| चणेरा | प्रतिनिधी |
चणेरा-रोहा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा व मुख्याध्यापक शिवाजी जोंधळे यांचा सेवागौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्यासमितीचे सचिव, विभाग प्रमुख, आजीव सेवक डॉ. श्रीराम साळुंखे, अर्थ सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी, रायगड विभाग प्रमुख प्राचार्य प्रकाश हाके, प्राचार्य बी. जे. दुधाळे, प्राचार्य ए. टी. साकोरे, पुणे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे, आजीव सेवक जी. जे बोराटे, पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे, रायगड विभाग निरीक्षक संजय महाजन, एस. एस. पाटील, एस. आर. बेडगे, रायगड विभागातील प्राचार्य व मुख्याध्यापक , पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, स्थानिक सल्लागार समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी, विद्यार्थी, कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
डॉ. बापुजी साळुंखे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
