| उरण | प्रतिनिधी |
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत उरण येथे शिवसेनाप्रणित ‘शिवतेज व्यापारी असोसिएशन’ च्या नामफलकाचे अनावरण माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. उरण शहरातील व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी, एकजुटीसाठी आणि स्वाभिमानासाठी स्थापन करण्यात आलेल्या या नव्या व्यापारी संघटनेचा नामफलक अनावरण सोहळा शुक्रवारी (दि.23) सकाळी 11 वाजता, उरण येथील राम मंदिर, राजपाल नाका येथे पार पडला. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच उरणमधील व्यापारी वर्गाला संघटित ताकद देण्यासाठी शिवतेज व्यापारी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या वेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, परमानंद करगुटकर, संपर्कप्रमुख दीपक भोईर, शेकाप ज्येष्ठ नेते काका पाटील, नगरसेवक विक्रांत म्हात्रे, कासारे, वंदना पवार, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, सूर्यकांत दरने, महेश वर्तक, अप्पा पाठारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







