| मुंबई | प्रतिनिधी |
संविधान दिनाचे औचित्य साधत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात अनावरण करण्यात आले. राज्य सरकारने युनेस्कोच्या मुख्यालयाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. युनेस्कोच्या मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. याप्रसंगी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकारने यापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी आणि त्याचे संग्रहालयात रूपांतरण केले आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठातही डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आहे. आता मुंबईतील इंदुमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामालाही वेग दिला आहे.







