| मुंबई | प्रतिनिधी |
यूपीआय व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या व्यापारी सवलत दर (एमडीआर) शुल्काला विरोध करण्यासाठी राज्यातील सुमारे 500 व्यापारी संघटना 2 ऑक्टोबरला ‘यूपीआय बंद’ आंदोलन करणार आहेत. या दिवशी व्यापारी कोणतेही डिजिटल पेमेंट स्वीकारणार नसून, केवळ रोख व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शुल्कामुळे लहान व मध्यम व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ होऊ शकते, असा व्यापारी संघटनांचा दावा आहे. त्यांचा विरोध यूपीआय व्यवस्थेला नसून व्यवहार शुल्काला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती रविंद्र माणगावे यांनी दिली.






