। उरण । वार्ताहर ।
पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीतील जलतरण स्पर्धेत नवी मुंबई तसेच जिल्हाभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात उरणच्या स्पर्धकांनी आपली छाप उमटविताना पदकांची लयलूट केली आहे. कर्नाळा स्पोर्ट्स असोसिएशन आणि क्वा स्पोर्ट्स असोसिएशन, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्हास्तराची जलतरण स्पर्धा नुकतीच घेण्यात आली.
या स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आठ वर्षे ते चाळीस वर्षांवरील गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत उरणच्या आर्यन मोडखरकर याने फ्रीस्टाई 50 मी, बॅक्स्ट्रोक 50 मी आणि बटरफ्लाय 50 मी, अशा तीनही प्रकारत सुवर्णपदकाची कमाई केली; तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या जयदीप सिंग, आर्य पाटील, रुद्राक्षी टेमकर, ओंमकार कोळी, मोहित म्हात्रे, वेदांत पाटील, वृतिका म्हात्रे, अनिता म्हात्रे आणि हितेश भोईर यांनी पदकांची कमाई केली आहे.