कर्जत शहरात नागरी स्वच्छता अभियानाला सुरुवात

। नेरळ । प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरात आयसीटी बेस प्रणालीच्या माध्यमातून नागरी स्वच्छ अभियान राबविले जात आहे. कर्जत नगरपरिषदेच्या वतीने या अभियानाची सुरुवात आणि उद्घाटन मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय करण्यात आले.
शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपले शहर स्वच्छ ठेवण्याबाबत सर्वांनी एकत्र येऊन या अभियानात सहभागी होऊन शहर स्वच्छ ठेवूया. त्यांनीही या आयटीसी महाराष्ट्र शासनाने निगरमित शासन निर्णयाच्या अनुषंगाने दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मांडणी ट्रेनिंगसाठी आयसीटी बेस प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे.

कचरा संकलन कर्मचार्‍यांद्वारे केल्यानंतर कोड स्कॅन केले आणि मोहिमेची सुरुवात झाली. बेस या प्रणालीद्वारे कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबतची माहिती दिली. सर्व नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारे आणि प्रशासक वैभव गारवे यांनी केले.

Exit mobile version