उरुग्वे फुटबॉल संघाची घोषणा

। माँटेव्हिडियो । वृत्तसंस्था ।

उरुग्वे फुटबॉल संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. लुईस सुआरेझ या अनुभवी खेळाडूची या संघात निवड करण्यात आली आहे. कोपा अमेरिका या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून राष्ट्रीय प्रशिक्षक मार्सेलो बिल्सा यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. उरुग्वे संघाचा ‘क’ गटात समावेश असून या गटात त्यांना अमेरिका, पनामा व बोलिविया या देशांचा सामना करावा लागणार आहे. लुईस सुआरेझ पाचव्यांदा कोपा अमेरिका ही स्पर्धा खेळणार आहे.

उरुग्वेचा संघ: गोलरक्षक- सर्जियो रोचेट, सँटीयागो मेल, फ्रँको इस्रायल. बचावपटू- रोनाल्ड अरॉजो, जॉस गिमनेज, सेबॅस्टीन सेरेस, निकोल्स मॅरीकल, मथास ओलिवेरा, लुकास ओलाझा, मतास व्हिया, गिर्लेमो वरेला, नाहीत्न एन. मधली फळी- मॅन्यूएल उगार्टे, रॉड्रिगो बेतांकुर, फेडरिको वालवर्दे, इमिलियानो मार्टीनेझ, निकोल्स डी क्रूझ, गिऑरजियन अरासकेएटा, अगस्टन कॅनोबियो. आक्रमक फळी- ब्रायन रॉड्रिगेझ, ब्रायन ओकॅम्पो, फाकुंडो पेलिस्ट्री, मॅक्सिमिलानो अरॉजो, ख्रिस्तीन ओलिव्हेरा, डार्विन नेज, लुईस सुआरेझ.

Exit mobile version