शेती करण्यासाठी आधुनिक यंत्राचा वापर

OLYMPUS DIGITAL CAMERA

अल्प वेळात शेतीची कामे पुर्ण; शेतमजूर शेतीच्या कामास मिळणे झाले अश्यक्य

। पाताळगंगा । वार्ताहर ।

आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शेतीमधील कामे आधुनिक पद्धतीच्या यंत्राद्वारे केली जातात. त्यामुळे ग्रामीण भागातपुर्वी गावोगावी बैलाद्वारे करण्यात येणारी शेतीची मशागत इतिहास जमा होत आहे. व त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या अत्याधुनिक यंत्रणेने घेतली आहे.

ग्रामीण भागात पुर्वी गावोगावी आढळणारे जनावरांचे कळप आता कमी होत, असल्याने पाळीव जनावरांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यातच सतत जनावरांचा चारा व पाण्याची समस्या गंभीर बनत असल्याने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सध्या संकटात सापडला आहे. पुर्वी शेती मशागतीसाठी बैलाचा वापर करत. आज ही होत आहे मात्र, मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत नाही. शेतकर्‍यांचा मित्र म्हणून बैलाची ओळख ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली होती. त्या बैलांना जन्म देणारी गोमाता म्हणून ओळखले जाते. मात्र, विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. त्यातच औताच्या सहाय्याने शेती करण्यासाठी व बैलाद्वारे शेतीची मशागत करण्यासाठी शेतगडीही मिळणे कठिण झाले आहे. शेतगड्याच्या वेतनाचे भाव हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे औताने शेती करणे शेतकर्‍यांना परवडत नाही.

ज्याच्याकडे जितके औत तितका शेतीचा दर्जा मोठा असा फार पुर्वी शेतकर्‍यांचा समज होता. परंतु, आता यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील नांगरणी, ऊखलन पेरणी इत्यादी कामे केली जातात. ही शेतीची मशागत करण्यासाठी लागणारा वेळही थोडा लागत असतो. मात्र, आजही ग्रामीण भागामध्ये गावरानी बैल कष्टाळू म्हणून ओळखला जात आहे. शेतकर्‍यासोबत शेतमजूरही आपल्याकडे म्हैस किंवा गाय नाही तर किमान बकरी तरी पाळत होते. त्यामुळे ग्रामीण भागात धवलक्रांती झाली होती. परंतु, आज या यांत्रिकीकरणाच्या जमान्यामध्ये शेतकरी अत्याधुनिक यंत्राकडे वळाला असून नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत. मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असल्यामुळे बैलाद्वारे करण्यात येणारी मशागत इतिहासजमा होत आहे.

Exit mobile version