। सुतारवाडी । वार्ताहर ।
रोहा येथील माजी नगराध्यक्ष डॉक्टर रमेश राजे यांची पत्नी डॉक्टर उषा रमेश राजे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. सध्या त्यांचे वात्सव्य पुणे येथे असल्याने अंत्यविधी पुणे येथे करण्यात आला. अत्यंत मन मिळावू स्वभावाने येणार्या पेशंटला आपुलकीने चौकशी करून त्यांना बरे करण्यात डॉ. उषा राजे यांचा हातखंड होता. त्यांच्या निधनाची बातमी समजतात रोहा, अलिबाग तसेच, अन्य शहरातील त्यांच्या चाहता वर्गाने दुःख व्यक्त केले.







