पनवेल येथे लसीकरण शिबीर

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेच्या मिशन कवच कुंडल अंतर्गत कोव्हिड-19 मोफत लसीकरण शिबिराचे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
मार्केटयार्ड परिसरातील नागरिकांना पनवेल महानगरपालिकेचे कोव्हिड-19 मोफत लसीकरण अंतर्गत लाभ मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी त्यांच्या स्वतःच्या अध्यक्ष असलेल्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या कार्यालयामध्ये पनवेल महानगरपालिकेचे मोफत लसीकरण शिबीर आयोजित करून सहकार नगर, पंचरत्न चौक, मार्केट यार्ड परिसरातील राहणारे इतर रहिवासी यांच्यासाठी शिबिराचे आयोजन केले. पनवेल महानगर पालिकेला आपल्या स्वतःची ऑफिसची जागा देऊन मोफत लसीकरण करून दिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version