ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल । वार्ताहर ।
ग्रुप ग्रामपंचायत पारगावने केले 124 जणांचे मोफत लसीकरण राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार अवलंबन करून पारगाव परिसरातील124 जणांचे मोफत लसीकरण केले. त्यासाठी प्रयत्नशील सरपंच अहिल्या नाईक यांनी लसीकरण पूर्ण करू या, कुटुंब समाज सुरक्षित करू या मिशन कवच कुंडल अंतर्गत माननीय उप विभागीय अधिकारी पनवेल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली व विजय तळेकर तहसीलदार पनवेल यांच्या सूचनेनुसार व माननीय गटविकास अधिकारी पनवेल तसेच पंचायत समित पनवेल आरोग्य अधिकारी यांच्या आधिपत्याखाली लसीकरण मोहिम राबविण्यात आली.
100% नागरिकांना पहिला डोस व दुसरा डोस लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत पारगाव हद्दीतील ज्या 18 वर्षावरील नागरिकांना पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आले. कवच कुंडल अभियान पारगाव येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक व उपसरपंच अंजली कांबळे, मा.उपसरपंच मनोज दळवी, मा.उपसरपंच सुशील कांत तारेकर, मा.उपसरपंच रत्नदीप पाटील, सदस्य निशा पाटील, बानुबाई म्हात्रे, सुनंदा नाईक, सोनाली भोईर, कल्पना तारेकर, शिल्पा नाईक, सदस्य विश्वनाथ पाटील, विजय वाघे तसेच तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव पाटील व डॉ.भारती, ऑपरेटर सोनाली देशमुख, प्रमोद म्हात्रे, आशा वर्कर वर्षा तारेकर व चंद्रभागा तारेकर व देवाळे आदी उपस्थित होते.