| पेण | प्रतिनिधी |
कोनायसन्स स्कूल पेण, रोटरी क्बल ऑफ पनवेल, रोटरी क्लब ऑफ ठाणे व जिविका हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.19) आणि (दि.25) एप्रिल रोजी हे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजनामध्ये डॉ. सोनाली वनगे यांचा मोलाचा सहभाग आहे. या लसीचे महत्त्व पटवून देताना डॉ. वनगे यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमधील सर्वात धोकादायक कर्करोग आहे. भारतात या आजारामुळे एका वर्षात सुमारे तीन लाख ते पाच लाख महिला आपला जीव गमावतात. हा एकच कर्करोग आहे ज्यासाठी प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. कारण हा कर्करोग पॅपिलोमा विषाणू ‘एचपीव्ही’ संक्रमणामुळे होतो. या विषाणूच्या कुप्रभावापासून संरक्षण करण्यासाठी ही लस सर्वोत्तम आहे. ही लस खूप प्रभावी आहे. साधारणपणे या लसीचे दोन डोस सहा महिन्यांच्या अंतराने घ्यावे लागतात. ही लस अनेक वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. परंतु, ती महाग असल्याने गरीब आर्थिक वर्गातील मुलींना परवडत नाही. मात्र, आम्ही ती विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.
या लसीकरण मोहिमेमध्ये जि.प.च्या शाळा, शासकीय शाळा आणि आदिवासी पाड्यातील सर्व मुलींना लसीकरण करण्यात आले आहे. आजपर्यंत सुमारे 2500 डोस उपलब्ध आहेत. त्यापैकी 1000 डोस दिले गेले आहेत. इतरही डोस द्यायचे आहेत. त्याबद्दल आम्ही लवकरच शिबीर लावणार आहोत. तरी, या शिबिराचा जास्तीत जास्त जणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सोनाली वनगे यांच्याकडून करण्यात आले आहे.