शेकापच्या प्रयत्नांतून राजिपच्या वतीने रामराजमध्ये लसीकरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रामराज विभागातील ग्रामस्थांचे लसीकरण व्हावे यासाठी रामराज आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी शेकापक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. त्यानुसार राजिपच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात जिल्हा परिषद सदस्य तथा उपकेंद्राचे अध्यक्ष मधु पारधी तसेच माजी सभापती तथा तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली व सुचना दिल्या. लसीकरण प्रक्रिया गेले काही महिने व्यवस्थित सुरू असल्याने कर्मचारी मंडळाचे कौतुक केले. यावेळी,शेकापचे पदाधिकारी सुभाष वागळे, मोहन धुमाळ, मधू ढेबे, नौशाद मुजावर, नंदकुमार गावडे, मेघश्याम झावरे, नितीन पालकर, गणेश धुमाळ, गजानन दिवकर, महेश झावरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version