40 लाख 40 हजार नागरिकांना मात्रा
76 हजार 575 कुमारांना डोस
19 हजार 092 प्रिकॉशन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाला हरवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आतापर्यंत 40 लाख 40 हजार 891 नागरिकांचे लसीरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 15 ते 17 वयोगटातील 76 हजार 575 नागरिकांनी लसींचा पहिला डोस घेतला आहे. तर प्रिकॉशन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 हजार 092 झाली आहे.
कोरोनाचा हाहाकार जिल्ह्यात थांबलेला नाही. तिसरी लाट येणार नाही असे बोलले जात असल्याने नागरिक सैराट आणि सरकार गाफिल राहीले होते. या कालावधीत विविध सण तसेच थर्टीफस्ट डिसेंबरचे सेलिब्रेशन धुमधडाक्यात साजरे करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला. दोन आठवड्याच्या अंतरामध्ये दिवसातील रुग्ण संख्या अडिज हजारांच्या वर पोचली होती. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाच्या उरात धडकी भरली होती. सरकार आणि प्रशासनाने लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिल्याने रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी होते. घरी उपचार घेऊनच रुग्ण बरे होतआहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या चोविस तासांमध्ये 419 रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 205 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामध्ये रायगड ग्रामिणमध्ये 73 आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील 132 रुग्णांचा समावेश आहे. जनरल बेडमध्ये 144, ऑक्सीजन बेडवर 23, आयसीयुमध्ये 38 तर 5 रुग्ण हे व्हेंटीलेटरवरआहेत. जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण हे घरामध्येचउपचार घेत आहेत.
पहिली लस घेणारे-22,05,210
दुसरी लस घेणारे- 17,91,734
प्रिकॉशन डोस घेणारे-19,092
वर्गवारी नुसार लसीकरण
फ्रंट लाईन वर्कर-1,37,754
हेल्थ केअर वर्कर-50,305
18-44 वयोगट-23,64,550
45-60 वयोगट-8,84, 056
60 वर्षा पुढे-5,27,651