नेरळ । वार्ताहर ।
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील पिंपळोली आरोग्य उपकेंद्रच्या माध्यमातून तळवडे गावातील ग्रामस्थांसाठी कोव्हिड लसीकरण शिबिर राबविण्यात आले. श्री साई ट्रस्ट नवी मुंबई आणि जय मल्हार मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ यांचे माध्यमातून तळवडे येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.एकुण 140 जणाचे लसीकरण झाले.श्री साई ट्रस्ट नवी मुंबई आणि जय मल्हार मित्र मंडळ यांचे कार्यकर्ते यांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर काटे तसेच आरोग्य कर्मचारी सुभाष चव्हाण आणि आरोग्य सेविका यांनी लसीकरण करून घेतले.