। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्याच्या सीमेवर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धनगरमलई हमरस्त्यालगत तोंडसुरे पंचक्रोशीचे जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या पुरातन वाघेश्वरी देवता मंदिराला पर्यटणीय दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे दिले. वाघेश्वरी देवता नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, येथे आवश्यक असणारी वीज, पाणी, रस्ता आदी पर्यटणीय सेवासुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक तेवढ्या शासकीय निधीची मंजुरी देण्यात येईल. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासमवेत तालुका अध्यक्ष समीर बनकर, बबन मनवे, छाया म्हात्रे, संदीप चाचले, पं.स. सदस्य मधुकर गायकर, सतीश शिगवण आदी मान्यवर, पंचक्रोशी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.