रक्तदान करून शहिदांना वाहिली आदरांजली

। कर्जत । प्रतिनिधी ।
26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ कर्जतमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 114 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.
कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 26/11 शहीद दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संकल्प ब्लड बँकेचे डॉ.राजशेखर नायर व कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक दीपा खडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हंगामी अध्यक्ष संदीप भोईर आदी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अभिजित मराठे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मीना प्रभावळकर, पोलीस हवालदार संदेश सानप, प्रशांत देशमुख, महिला पोलीस हवालदार संजिता सानप, बाबासाहेब जाधव, संदीप माळी, शैलेश कदम, हर्षल जमदाडे, जयवंत कोळी, नरेश नांदगावकर, महेश ठाकूर, गणेश बोराडे उपस्थित होते.

Exit mobile version