| महाड | वार्ताहर |
जिल्हा पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये फजंदार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वहूर-महाड शाळेने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात तसव्वूर घोले याने गोळाफेक प्रकारात प्रथम क्रमांक आणि थाळीफेकमध्ये द्वितीय, 17 वर्षे वयोगट मुली हातोडा फेकमध्ये जायरा रेहमान द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली असून 21 व 22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत. तसेच शाळेतील सुवेद मांदरे 400 मीटर धावणे चतुर्थ क्रमांक, अजलान पटेल 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अब्दुल रऊफ फजंदार व सेक्रेटरी पटेल तसेच संस्थेचे पदाधिकारी नदीम फजंदार, शाळेचे मुख्याध्यापक राहील तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक रमेश खोत व विजेते विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.







