| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील धाकेश्वर मित्र मंडळ यांच्यावतीने यशस्वीरित्या संपन्न करण्यात आलेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत वैजनाथ हा संघ चषकाचा मानकरी ठरला आहे. खांब विभाग क्रिकेट असोसिएशन व धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे यांच्यावतीने देवकान्हे जवळील बाहे येथील प्रशस्त क्रीडा मैदानावर संपन्न करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत वैजनाथ संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून अंतिम विजेतेपद पटकावले व गावदेवी बाहे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर धाक्सूद चिल्हे संघाने स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादित केले. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज पंकज सावरकर वैजनाथ, उत्कृष्ट गोलंदाज रोशन कोंडे चिल्हे, मालिकावीर रोहीत थिटे बाहे संघाने स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादित केले. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज पंकज सावरकर वैजनाथ, उत्कृष्ट गोलंदाज रोशन कोंडे चिल्हे, मालिकावीर रोहीत थिटे बाहे यांना तसेच विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, भाजपा नेते अमित घाग, विजय बोरकर, अनंत थिटे, चंद्रकांत जाधव, मंगेश सरफले, नारायण कान्हेकर, वसंत शेडगे, राजेश सुटे, अमृता खामकर, उदय खामकर, अरूण आगळे, देविदास भोईर, रविंद्र मामलुस्कर, अजय बाकाडे, महेश शिंदे, रमेश धनावडे, मनोज बामणे, विश्वनाथ भोईर, संदेश गायकवाड, ज्ञानेश्वर भोईर, दयाराम भोईर, दिनेश भोईर, निखिल भोईर आदी मान्यवरांनी दिवसभरात भेटी देऊन मंडळाच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.







