वाळणच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम

। रायगड । प्रतिनिधी ।

शाळेचे आपल्या आयुष्यातील स्थान अनन्य साधारण आहे. शालेय जीवनातील आठवणी कायमस्वरुपी स्मरणात राहतात. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा आपले बालपण आठवण्यासाठी तब्बल 35 वर्षांनंतर वयाची पन्नाशी ओलांडलेले सर्व शाळकरी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांनी रविवारी (दि.28) ठाणे धर्मवीर नगर येथील शिवसेना शाखेत स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित न्यू इंग्लिश स्कूल वाळण बुद्रुक या हायस्कूलमधील सन-1988-89 इयत्ता दहावीच्या बॅच मधील विद्यार्थींनी वयाच्या वयोमर्यादेचे आकस न बाळगता एकत्र आले होते. या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी शशिकांत कालगुडे, रविंद्र सकपाळ, किशोर गमरे, विलास शिंदे, रविंद्र कालगुडे, दीपक पवार, काशिनाथ पवार, सुनिल शिंदे, विक्रम उतेकर, प्रशांत कालगुडे,चंद्रप्रकाश ओमले, गंगाराम गोडावळे, कैलास पवार, संजय सोनार, मधुकर मोरे, शशिकांत ताम्हणकर, विठ्ठल बेंदुगडे, विनायक पवार, राजेश मोरे, संदिप कालगुडे, सुरेश शिंदे, आनंद कडू, शांताराम शिंदे, राजू जगताप आदि उपस्थित होते.
सन-1988-89 इयत्ता 10 पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहींनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन वकील पदापर्यंत पोहचले तर काहीजण इयत्ता दहावी पर्यंतच्या शिक्षणानंतर विविध शहरांमध्ये शासकीय, खाजगी आणि काहीजण उद्योग, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. जवळपास 35 वर्षांच्या दीर्घकालावधीनंतर एकत्र येण्याचा संकल्प शशिकांत कालगुडे, रविंद्र सकपाळ, किशोर सुदाम गमरे यांच्या माध्यमातून साकारला गेला आणि तो कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Exit mobile version