। रसायनी । वार्ताहर ।
व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम व एक्झिबिशन स्पर्धा पाताळगंगा येथील विश्वनिकेतन इंजीनिअरिंग कॉलेज येथे तज्ञ अभ्यासक, उद्योजक, प्राध्यापक यांच्या परिक्षणाखाली संपन्न झाली. मूल्यवर्धन प्रोजेक्ट प्रदर्शन कार्यक्रमातून अभ्यासक्रम प्रशिक्षणतत्वानुसार शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्वयंमूल्यमापन, नव कल्पनांना आत्मसात करण्याचे उद्दिष्टे ठेवून प्रिसिजन इलेक्ट्रो प्रॉडक्ट लिमिटेड डायरेक्टर दिवाकरण पिल्ले व टाटा स्टील खोपोली प्रोजेक्ट प्रमुख कपिल मोदी यांनी परीक्षा केंद्राचे फित कापून उद्घाटन केले.
या स्पर्धेत विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी रस्ते आस्थापना ऊर्जा मार्केटिंग नेटवर्किंग उड्डाणपुले नगररचना अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिके व डेमो तयार करून प्रदर्शनातून आपापल्या विषयाची माहिती दिली विश्वनिकेतन इंजीनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उत्साह व प्रयास पाहता मान्यवरांनी व्यवस्थापनाच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विजेत्यांस बक्षिसे व प्रमाणपत्र दिले.







