| मुंबई | प्रतिनिधी |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर गुरुवारी एका महिलेने तोडफोड केली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या फडणवीसांच्या ऑफिसबाहेरील नावाची पाटी काढून तिने फेकून दिली. मंत्रालयाचा पास न काढता तिने सचिव गेटने प्रवेश करत ती सहाव्या मजल्यावर पोहोचली होती. एकीकडे महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना, दुसरीकडे मंत्रालयही सुरक्षित नसल्याचे या घटनेने दिसून आले आहे. याप्रकरणी आता उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्या महिलेने तोडफोड केली त्या महिलेची उद्विग्नता समजून घेऊ तिची व्यथा दूर करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.