आंबोली गावातील अंगणवाडीची तोडफोड

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आंबोली गावात लहान मुलांना शिकण्यासाठी अंगणवाडी इमारत आहे. या ठिकाणी गावातील लहान मुले आपले प्राथमिक शिक्षण घेत असतात. परंतु, उंडर गावातील दोन तरुणांनी रात्रीच्या वेळी या अंगणवाडीची तोडफोड केली आहे. निकेतन नारायण सातमकर (21) व प्रणय प्रमोद गुंड (21) असे तोडफोड करणाऱ्यांचे नाव असून, त्यांनी अंगणवाडीतील हॉल मधील दोन खिडक्या, स्टोअर रूम व स्वयंपाक घरातील एक-एक खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. तसेच, अंगणवाडीतील सामानाचीही तोडफोड करून अंगणवाडीचे मोठे नुकसान केले आहे. याबाबत अंगणवाडी सेविका इंदिरा ठाकूर यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीची दखल पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी घेऊन या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिएनएस 2023 चे कलम 334 ( 4),329 ( 1),3 (5), सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कलम 1984 चे कलम 3 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version