। भोपाळ । वृत्तसंस्था ।
मध्य प्रदेश येथील कुरवई केथोरा रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
अधिक माहितीनुसार, कुरवई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून ही आग फक्त बॅटरी बॉक्सपुरतीच मर्यादित होती. या घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून तत्परतेने आग विझवली आहे. तसेच, चाचणीनंतर ट्रेन पुन्हा रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.