। पुणे । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ, व्यासंगी लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे सोमवारी (दि.17) पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. असाध्य कर्करागाच्या विकाराशी त्यांनी संघर्ष केला. गेले काही महिने त्यांना पुन्हा एकदा कर्कराेगाच्या विकाराचा त्रास सुरु झाला होता.
मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. ही पदवी घेतली होती. त्यानंतर १९६४ साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. दिवंगत मंगलाताईं नारळीकर यांना विनम्र आदरांजली!