प्रशासनाचा मोठा निर्णय
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड येथे काल झालेल्या मोठ्या दुर्घटनेनंतर प्रशासन सावध झालं आहे. त्यामुळे आता कोकण आणि पुण्याला जोडणारा वरंधा घाट अवजड वाहनांसाठी तीन महिने पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक हे केवळ नियंत्रित पद्धतीनेच ज्या वेळेला पावसाचा इशारा नसेल त्याच वेळेला सोडले जाणार आहेत. वरंधा घाटात देखील दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या दुर्घटनांमध्येदेखील दुर्दैवाने अनेकांचे प्राणही गेले आहेत. दरम्यान, महाडजवळ असलेला भोर वरंधा घाट आणि येथील हलक्या प्रवासी वाहनांच्या वाहतुकीवर महाड प्रशासनाचे प्रमुख डॉ. ज्ञानोबा बनापुरे प्रशासनाचे नियंत्रण असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 22 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत वरंधा घाट अवजड वाहतुकीकरिता बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.