| महाड | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या माध्यमातून मनसे महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त सोमवारी कुंभार आळी, तांबड भुवन, भोई आळी, प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमातंर्गत आधारकार्ड रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, नविन मतदार नोंदणी, वृद्धापकाळ, दिव्यांग, राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना अशा विवीध प्रकारची कामे या राबवण्यात आली. तसेच शाळा क्रमांक 1 व शाळा क्रमांक 2 यामधील विद्यार्थ्यांना त्या बरोबरच महाड मधील कुंभारआळी आणि तांबडभुवन परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
वाढिवसानिमित्त विविध उपक्रम
