राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध उपक्रम

आंबिवली शाळेत रामलल्ला वेशभूषा

रा.जि.प. शाळा आंबिवली येथे श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीराम प्रभू व सीता मातेची वेशभूषा करून जय श्रीराम नावाच्या जयघोषाने अवघा गाव श्रीरामय झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बादल जाधव, शिक्षण प्रेमी प्रतिक वरे, अक्षय शेपुंडे व ग्रामस्थ प्रभात फेरीत सहभागी झाले होते.

उरण ग्राईडवेल नॉर्टन कंपनीत श्रीरामांची पूजा

अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील मोरा येथील ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनीमध्ये जनरल मॅनेजर कमलजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीमध्ये श्री रामाची प्रतिमा ठेवून फुलांनी सजवून प्रतिमेस हार घालण्यात अल्ला. नंतर अधिकारी प्रकाश पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच, रांगोळी काढून सर्व परिसर सजविण्यात आला होता.

या वेळी जनरल मॅनेजर कमलजीत सिंग, परेश मल्होत्रा, प्रकाश पाटील, आय.बी. सिंग, जहीर चौधरी, सागर पारधी, भूषण पवार, विनायक देरवनकर, मनोज सिंग, आदित्य कावळे, रवी नाईक, अविनाश पाटील, गणपत दाटेकर, ॠतुजा भेलखोडे, केदार साखळकर, अभय जाधव, अमित पाटील, निरंजन चंदनापुरकर, निशा जालनावाला, सुचिता कोळी, प्रीतम सरोदे, युनियन प्रतिनिधी, कामगार वर्ग, कर्मचारी, कंत्राटी कामगार आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोलाडमालसई गावात राम नामाचा जयघोष

अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि.22) करण्यात आली, या आनंदा निमित्ताने मालसई गावासह पंचक्रोशी श्री राम घोषणांनी दुमदुमली. या सोहळ्यानिमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

प्रत्येक गावातील देवांचे अभिषेक व पुजा, गावातील शोभायात्रा, प्रत्येक गावात भजन, प्रत्येक गावात पुष्पवृष्टी नंतर आरती व महाप्रसाद व श्रीराम मंदिर पिंगळसई येथुन शोभायात्रा काढण्यात आली. यात जय राम श्री राम जय जय राम नावाचा जप करण्यात आला व पंचक्रोशीतील आलेल्या या शोभा यात्रेत राम, सीता, लक्षमण व हनुमान यांची वेशभूषा करण्यात आली.

खांदा निल्स लेक व्हू सोसायटीत प्राणप्रतिष्ठा

रामलल्ला प्राण प्रतिष्ठाण सोहळ्या निमित्त खांदा कॉलनीतील निल्स लेक व्हू सोसायटीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यूनिसेफचे राज्य सल्लागार जयंत देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.


वारकरी संप्रदायाचे अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. देशपांडे यांनी निल्स लेक व्हू सोसायटीत प्रभू राम चंद्राच्या चरणी प्रवचन रुपी सेवा दिली. सोसायटीतील सदस्यांसाठी त्यांना ऐकण्याची पर्वणी होती. तसेच, भजन आणि राम रक्षा सामूहिक पठण व प्रसादाचा कार्यक्रम होउन संपूर्ण दिवस भक्तीमय वातावरणा साजरा झाला.

तळा येथे भव्य शोभायात्रा

अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने तळा शहरात भव्य शोभायात्रेचे सकल हिंदू समाज संघटने तर्फे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेेत तळा प्राथमिक मुलांची शाळेतील विद्यार्थ्यांनी व तळा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानाची व शबरीची विविध वेशभूषा करून श्रीरामपंचायतन अवतरल्याचे नयनरम्य दृष्य विषेश आकर्षण ठरून शहरातील सर्वांचे लक्ष वेधले.


सायंकाळी शोभायात्रा मधली ब्राह्मण आळी मारुती मंदीर येथून काढून बळीचा नाका, एसटी स्टॅन्ड, नगरपंचायत नाका, श्रीराम चौक व पुढे पुरातन श्री राम मंदिर कुरुंडा येथे महाआरती करून समारोप करण्यात आला.

आयुक्त गणेश देशमुख यांची सहपरिवार महाआरती

कळंबोली येथे अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने श्री राम मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सहपरिवाराने महाआरती केली.

यावेळी राम भक्तांनी मोठ्या संख्येने महाआरतीचा आणि दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण कळंबोली परिसर रामाच्या आरतीने जयघोषाने दुमदुमला होता. सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

तळा बाजारपेठ भगवेमय

अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळा बाजारपेठेत काढण्यात आलेल्या शोभा यात्रेचा उत्साह शिगेला पोहचला असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी तालुक्यातील सर्व रामभक्त रामरंगी रंगले होते.


तसेच, तळा बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत राम भक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठ भगवेमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सायंकाळी श्रीराम मंदिरात महाआरती झाल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

श्री राम प्राणप्रतिष्ठापना दिनाचे औचित्य साधून गोंधळपाडा, गवळीवाडी, वेश्‍वी ग्रामस्थांच्या वतीने गोकुळेश्‍वर तलावाभोवती 5000 दिवे उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Exit mobile version