वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

| पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस रविवार (ता.15) पनवेल आणि उरण तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधतं जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून शुश्रूषा सुपरस्पेशालिटी रुग्णालय-पनवेल, डॉ.डी. जी पोळ फाउंडेशन व वाय.एम.टी आयुर्वेद रुग्णालय-खारघर यांच्या वतीने उरण तालुक्यातील पिरकोन येथे पंचरत्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच रोहन अरविंद गावंड व त्यांच्या पत्नी.रसिका रोहन गावंड या दाम्पत्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून पिरकोन येथील डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील ,विद्यालयातील गरीब, गरजू असे एकूण 104 विद्यार्थ्यांची वार्षिक फी एकूण 42,240 एवढी फी भरली. या कार्यक्रमास कलावती गावंड, अनंता गावंड, स्वामीनाथ गावंड, निखिल गावंड,कमलाकर गावंड, अंकित पाटील, रसिका ठाकूर, प्रियांका पाटील, दशांकी गावंड, रसिका गावंड, जगदीश गावंड, मनिराम गावंड, अनंत गावंड, धनंजय पाटील, प्रदीप पाटील, रोहन गावंड, जगदीश पाटील, नम्रता गावंड, यु. व्ही. जगताप, रूपाली म्हात्रे,विलास पाटील,सुधीर गावंड,सुरेंद्र गावंड,संतोष मोकल, तसेच शेकाप,शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळेचे सर्व विद्यार्थी, आरोग्य तपासणीसाठी आलेले सर्व नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version