म्हसळ्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

| म्हसळा | वार्ताहर |

नगरपंचायत आणि प्राथमिक मराठी शाळा म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत आणि प्राथमिक शाळा म्हसळा येथे छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक पवन चौधरी, संजय दिवेकर, राखी करंबे, समीर बनकर, अनिकेत पानसरे, जयश्री कापरे, सरोज म्हशीलकर, दिपाली मुंडये, आग्रे, करडे, बाबू शिर्के, सुमित्रा खेडेकर, दिलीप शिंदे, अरुण माळी, इंदिरा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version