जेएसडब्ल्यूतर्फे विविध स्पर्धांना प्रतिसाद

। पेण । वार्ताहर ।
डोलवी,ता.पेण येथील जेएसडब्ल्यूच्यावतीने आझादीचा अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्वच स्पर्धाना परिसराती गावांनी उदंड प्रतिसाद दिला.

डोलवी ते गडब अशी पाच किमीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्टील जनजागृती व्हावी म्हणून या विशेष मॅरेथॉनमध्ये  900 स्पर्धक  सहभागी झाले होते. सहभागीदारांमध्ये विविध समूह, क्लब, स्थानिक महिलांकरवी ग्राम पंचायतीनजीक चालविण्यात येणार्‍या स्वयंसेवी बचत गटांनी सहभाग नोंदवला.

निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा:  आत्मनिर्भर विषयावर विविध निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. जनता हायस्कूल- गडाब गाव, जय किशन विद्या मंदिर, वडखळ आणि केईएस स्कूल, शहाबाज  अशा तीन स्थानिक शाळांमधील 150 पेक्षा अधिक विद्यार्थी निबंध स्पर्धेत सहभागी झाले होते. केईएस स्कूलच्या रेवदंडा आणि वाळके येथील 60 शाळकरी विद्यार्थी वकृत्व स्पर्धेत सहभागी झाले होते.

निबंध लेखन स्पर्धेतील विजेते:
जनता हायस्कूल, गडाब: प्रियंका बंधनू स्वन्सी (इयत्ता 10 वी), ईश्‍वरी प्रकाश तांडेल (इयत्ता 8 वी) आणि श्रेष्ठा प्रदीप पाटील (इयत्ता 9 वी). जय किशन विद्या मंदिर, वडखळ:  अनीश राजेश पाटील (इयत्ता 10 वी), सिद्धी निनाद भोईर (इयत्ता 10 वी) आणि दीक्षा दिनकर म्हात्रे (इयत्ता 10 वी). केईएस हायस्कूल, शहाबाज: कुलदीप हेमंत जुईकर (इयत्ता 9 वी), भार्गवी रणजित म्हात्रे (इयत्ता 9 वी) आणि तन्वी दीपक थळे (इयत्ता 9 वी).

वक्तृत्व स्पर्धेचे विजेते: केईएस स्कूल, रेवदंडा: हर्षवर्धन नांदगावकर (इयत्ता 9 वी), हर्ष पाटील (इयत्ता 8 वी) आणि मृदुला देसाई (इयत्ता 9 वी). केईएस स्कूल, वाळके: सन्वी मांडलेकर (इयत्ता 8 वी), वेदिका खोत (इयत्ता 8 वी) आणि विकी भोईर (इयत्ता 9 वी)

ग्राम स्वच्छता उपक्रम: डोलवी, खार धोंबी, गडाब गाव आणि वाघूळवाडी अशा अनेक गावांत ग्राम स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. या स्वच्छता उपक्रमात 230 हून अधिक स्थानिक गावकर्‍यांनी सहभाग नोंदवला. यावेळी स्थानिकांचे प्रमुख म्हणून डोलवी सरपंच वनिता म्हात्रे,गडब सरपंच  अपर्णा कोठेकर ,ग्राम पंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Exit mobile version