माथेरानमध्ये विविध विकासकामे मार्गी

योगेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात अनेक विकासकामे मार्गी लागली असून, त्यासाठी समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. एकंदरीत वनव्यवस्थापन समितीला वाहन कराच्या माध्यमातून जे काही भरीव उत्पन्न प्राप्त होते, त्याचा सदुपयोग योगेश जाधव यांनी विकासकामांसाठीच केल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत आहे.

मागील पाच वर्षांपूर्वी या समितीची धुरा योगेश जाधव यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी आपल्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या परीने निश्‍चितच प्रयत्न केलेला स्थानिकांना दिसत आहे. अनेक महत्त्वाच्या पॉईंट्स वर ज्या ज्या ठिकाणी धोकादायक जागा आहेत, त्याठिकाणी लोखंडी संरक्षक रेलिंग लावून अपघाताचे प्रमाण रोखले आहे. माथेरानची खरी ओळख इथली गर्द वनराई आहे. आणि हीच वनराई कायमस्वरूपी अबाधित राहिली तरच याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. ही बाब ओळखून योगेश जाधव यांनी समितीच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्यात मोठया प्रमाणावर विविध पॉइंट्स वर विविध प्रकारच्या रोपांची लागवड (वृक्षारोपण) केल्यामुळे लुईझा पॉईंट, एको पॉईंट त्याचप्रमाणे गारबट पॉईंट याठिकाणी वृक्षारोपण केल्यामुळे त्या त्या भागात गर्द झाडी पहावयास मिळत आहे.

Exit mobile version