| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचा धडाका सुरु आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या 38 लाखांच्या निधीमधून पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. तर, ग्रामपंचायत हद्दीत नव्याने 56 लाखांची विकासकामे मंजूर झाली आहेत, त्यांचे भूमीपूजन करण्यात आले. तर ग्रामपंचायतीच्या निधीमधून साडे एकोणीस लाखांची कामे सुरु करण्यात आली.
याप्रसंगी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे, कर्जत नगरपालिका माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांच्यासह राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सागर शेळके, महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे, दहिवली ग्रामपंचायतचे सरपंच चिंधु तरे, आसल ग्रामपंचायतचे सरपंच रमेश लदगे,शेकाप पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष वैभव भगत,चिंचवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच हृषीकेश भगत,संतोष भगत तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी उकरूळ ग्रामपंचायतच्या सरपंच वंदना थोरवे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत झाले. ग्रामपंचायतच्या उपसरपंच नीलिमा थोरवे,सदस्य सदानंद थोरवे,भालचंद्र सावंत,राम खडे,लता खडे,रंजना सोमणे,शोभना खडे,कविता सोमणे आणि कविता कराळे आदी उपस्थित होते.