संत गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

। उरण । वार्ताहर ।
कुंभार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत गोरोबाकाका यांच्या 705 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चिरनेर गावातील कुंभार समाजाच्या बांधवांनी विठ्ठल रखुमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या धार्मिक सोहळ्याचे औचित्य साधून चिरनेर परिसरातील अनेक भाविकांनी आपापल्या कुटुंबासह उपस्थिती दाखवून मंदिरातील विठ्ठल रखुमाई, साईबाबा, तुकाराम महाराज आणि संत गोरोबाकाका यांची विधीपूर्वक पूजाअर्चा करून दर्शन घेतले
यावेळी संत गोरोबाकाका सेवा मंडळ कलानगर चिरनेर उत्सव कमिटीचे अध्यक्ष दामोदर चौलकर, उपाध्यक्ष नारायण चिरनेरकर, सचिव सुभाष हातनोलकर, खजिनदार दिगंबर बिरवाडकर, महिला कमिटीच्या अध्यक्षा दीपा गोरे, उपाध्यक्षा उल्का चौलकर, सचिव शीतल चौलकर, खजिनदार नीलम चौलकर तसेच गणेश चिरनेरकर यांनी धार्मिक कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी मेहनत घेतली आहे.

Exit mobile version