भुवनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

| सोगाव | प्रतिनिधी |

भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट, 18 गाव समिती, चिंचवली-नारंगीतर्फे रविवारी (दि.15) श्रीक्षेत्र भुवनेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्र उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली. याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे, तसेच 18 गावांच्या हद्दीत नागरिकांना 24 तास तत्पर वैद्यकीय सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर महिला वैद्यकीय अधिकारी, कला व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्याचा गुणगौरव होणार आहे. याशिवाय संगीत भजनांचे कार्यक्रम व सौरऊर्जा जनित्र उपकरणाचे लोकार्पण मंगल ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, सकाळी साडेसहा ते नऊ या काळात वाघ्रणचे विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ, तसेच माणकुले येथील श्रीदत्तकृपा प्रासादिक महिला भजन मंडळातर्फे भजने सादर होणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सौरऊर्जा जनित्र लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या दरम्यान गुणगौरव सोहळा होणार आहे. दुपारी पावणेएक ते सायंकाळी चार या दरम्यान जय भवानी मंडळ, रामपाडा-वैजाली-हाशिवरे यांचे सुमधुर भजन व बालकलाकर यांचे किलबील गुंजन होणार आहे.

Exit mobile version