चेंढरेतील गृहनिर्माण संस्थेमार्फत विविध कार्यक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदर्शवत रेसिडेन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सी शेल रेसिडेन्सी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त धार्मिक, आरोग्य शिबीर घेण्यात आले.

गृहनिर्माण सोसायटीमधील सदस्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर दर्शन पाटील यांच्या सहकार्यातून घेण्यात आले. यामध्ये सुमारे 100 सदस्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर भजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. सामजिक एकोपा व कौटुंबिक सलोख्याच्या हा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, अन्य पदाधिकारी, सभासद, महिला, बाल वर्गाने महत्वपूर्ण योगदान दिले.

Exit mobile version