वसंत मोरे यांची अध्यक्षपदावरुन उचलबांगडी

| पुणे | प्रतिनिधी |
मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यास नकार देणार्‍या वसंत मोरे यांची पुणे मनसे अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.तसे फर्मान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले आहे.मोरे यांनी आपल्या मतदार संघात मुस्लिम मतदारही असल्याने भोंगे काढणर नसल्याचे जाहीर केले होते. मनसेनं अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे. नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version