वसंत पंचमी उत्साहात साजरी

। उरण । प्रतिनिधी ।

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतुंचा राजा असेही मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा वसंत पंचमी हा विशेष दिवस असतो. अनेकजण विविध धार्मिक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून माता सरस्वतीचे पूजन करून या ऋतूचे स्वागत करतात.

उरण तालुक्यात बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे श्री विठ्ठल मंदिर देऊळवाडी उरण शहर येथे विविध उपक्रम, कार्यक्रम राबवून वसंत पंचमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी देवीची प्राणप्रतिष्ठा, दुपारी महाप्रसाद, भजन, रात्री गायन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्तसूर संगीत दरबारतर्फे गायिका जयश्री पुजारी यांनी तसेच, हार्मोनियम गोपाळ पाटील, तबला वादक संतोष खरे, टाळ वादक सुरेश पुजारी यांनी धार्मिक गिते गाऊन सर्वांची मने जिंकली.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, कमळाकर पाटील, मधुकर पाटील, लोकेश म्हात्रे, गुड्डू यादव, राजेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version