| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत श्रीगाव हद्दीतील भाकरवड गावचे रहिवासी वासुदेव श्रीधर म्हात्रे बी.एम.सी मेरीव्हेदर कुलाबा पंपिंग येथे कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या वयाच्या 35 वर्षे सेवा केली.
17 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांची नियुक्ती बृहन्मुंबई महानगर पालिका येथे करण्यात आली होती. भाकरवड गावाशी नाळ जुळलेले वासुदेव म्हात्रे आपल्या लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडल्याने त्यांनी मुंबईस नोकरीसाठी प्रयत्न केले आणि आपल्या गुणवत्तेवर बृहन्मुंबई येथे कामावर रुजू झाले. आपल्या प्रामाणिक सेवेत त्यांनी अधिकार्यांची मने जिंकली. कधीही कामचुकारपणा केला नाही. दरम्यान, वासुदेव म्हात्रे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात कुलाबा पंपिंग मुख्य शाखा वरळी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमासाठी बी.एम.सी.चे वरिष्ठ कार्यकारी अभियंता मोहन बापट, दुय्यम अभियंता वाजीत पठाण, कर्मचारी परेश पाटील, समीर पाटील, प्रमोद मानकर, रामचंद्र पाटील, रामचंद्र कर्वे, विवेक म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, शशिकांत पाटील, वसंत पाटील, अंकित माळी, उल्लास ठाकूर, मनोज म्हात्रे, दिनेश देवघरे आदी मान्यवर उपस्थित होते.