वेदा जनजागृती मंचाची जाणता राजा मॅरेथॉन संपन्न

| महाड | वार्ताहर |

महाड मधील वेदा जनजागृती मंच या संस्थेच्या वतीने जाणता राजा ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. वेदा जनजागृती मंच या संस्थेच्या वतीने दिनांक 21 रोजी जाणता राजा ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान माझी वसुंधरा पर्यावरण संवर्धन अशा अनेक विषयांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये तीन गट करण्यात आले होते. यातील 10 ते 14 या मुलांच्या गटांमध्ये प्रथम क्रमांक संस्कार रुपेश शिर्के याने पटकावला तर द्वितीय क्रमांक अजिंक्य अमित शिंदे, तृतीय क्रमांक चंदन सचिन शेलार आणि चौथा क्रमांक रुद्र मंगेश कळमकर, पाचवा क्रमांक विनायक दिलीप बेटकर यांनी तर याच गटातील मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूजा तुकाराम सावंत, द्वितीय क्रमांक स्मीती नारायण, जाधव आणि तृतीय क्रमांक श्रावणी संदीप जाधव यांनी पटकावला.

मुलांच्या 14 ते 16 या वयोगटात प्रथम क्रमांक दुर्गेश नवनाथ कवडे, द्वितीय क्रमांक स्वप्नज भीमराव साळवे, तृतीय क्रमांक यश नितीन नारखेडे याच वयोगटातील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्रचिती शेखर जाधव, द्वितीय क्रमांक श्रद्धा सतीश देशमुख, तृतीय क्रमांक निधी दर्शन पेंढारी यांनी पटकावला चाळीस वर्षे वयोगटांमध्ये महिलामध्ये पाच किलोमीटर सौ. रुचिता रमेश मुळे यांनी विजय संपादन केला. चाळीस वर्षावरील पुरुष गटात नथू गणपत पवार यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक प्रवीण कृष्णा नथेरी, तृतीय क्रमांक सचिन मधुकर शेलार याने पटकावला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर गीते, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, तहसीलदार महेश शितोळे यावेळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेदा जनजागृती मंचाचे वसंत साळुंखे, तानाजी गावडे, जोष्ठे, तुषार शेठ, राम बडे, सुहास आव्हाड, यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version