उरणचा वेद म्हात्रे आकाशवाणीवर झळकला

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाले येथील वेद राजेंद्र म्हात्रे हा आकाशवाणी केंद्रावर झळकला आहे. आकाशवाणीवर शाळे बाहेरची शाळा हा 351 वा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. वेदच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वेद हा एका सर्वसामान्य कुटुंबातील असून तो इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. मोठे होवून त्याला गणित शिक्षक व्हायची इच्छा आहे. समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि प्रथम एजुकेशन फाऊंडेशन यांच्यातर्फे निपुण महाराष्ट्र हे अभियान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यासाठी माता-पालक गटाच्या सहभागाने राज्यभर राबविले जात आहे. यासोबतच अंगणवाडी ते प्राथमिक इयत्तासाठी ‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रम देखील प्रत्येक आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रोजी आकाशवाणीवर सकाळी साडे दहा वाजता प्रसारीत केला जातो. वेदची आई शर्मिला राजेंद्र म्हात्रे यांनी सर्वांचे आभार वेक्त केले आहेत.

Exit mobile version