रसायनीच्या वेदांतची बाईक सुसाट

ऑल इंडिया दि व्हिली रन स्पर्धेत भारतात दुसरा; जिल्ह्यातील एकमेव वेगावान मोटारसायलक चालक

| रसायनी | वार्ताहर |

लोणावळा येथे झालेल्या ऑल इंडिया दि व्हिली रन 2022 क्लास एफ-3 सर्वात वेगवान व्हिली भारतीय मोटासरसायकल (550 सीसी) स्पर्धेत रिस रसायनी येथील रहिवासी प्रिआ स्कूलचा विद्यार्थी वेदांत सुधीर शिंदे याने दुसरा क्रमांक पटकावला. वेदांत हा जिल्ह्यातील एकमेव वेगवान मोटारसायल चालक ठरला आहे. तो पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे यांचा चिरंजीव आहे. वेदांतच्या यशाबद्दल त्याचा सन्मान सोहळा गणेशनगर येथे पार पडला.

लोणावला येथे झालेल्या ऑल इंडिया दि व्हिली मोटारसायकल स्पर्धेत वेदांतने व्दितीय क्रमांक पटकावून नावलौकिक मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल गणेशनगर येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे, युवा नेते अंकित साखरे, सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रसायनीकरांच्या वतीने वेदांतचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, वेंदात 550 सीसी मोटारसायकल एका चाकावर चालवितो. यात महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतर एका चाकावर मोटारसायकल चालविणारा वेदांत जिल्ह्यातील एकमेव वेगवान मोटारसायकल चालक ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल वेदांतचे स्थानिक राजकीय व सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version